पोस्ट्स

नासिक कर्फ्यू डायरी : दिवस पहिला : गुढीपाडवा... अन् युद्धाचा दिवस!

नासिक कर्फ्यू डायरी : दिवस पहिला गुढीपाडवा... अन् युद्धाचा दिवस! स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आम्ही आतापर्यंत असंख्य युद्ध लढली आहेत. नासिकच्या इतिहासात दोन हजार वर्षांपूर्वी लढलेल्या एका युद्धाचा आजच्या सणाशी आणि आज आपण लढत असलेल्या लढ्याशी एक अनोखा संबंध आहे. आजचा गुढीपाडवा कायम स्मरणात राहिलं, अशी लढार्इ आपण लढत आहोत, आपलं शहर लढत आहे आपला देश लढत आहे, आपलं जग लढत आहे. आपण यापूर्वीच्या लढाया कधी हरलो नाहीत. मात्र, फितूरी होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. काय संबंध आहे गुढीपाडव्याचा आणि नासिकच्या त्या लढार्इचा.. ‘नासिक कर्फ्यू डायरी’त कर्फ्यूच्या पहिल्या दिवसाची कहाणी! ---- काय योगायोग आहे ना? मराठी माणसासाठी हा नववर्षाचा पहिला दिवस. नवीन काही संकल्प करण्याचा आणि तो तडीस घेऊन जाण्यासाठी निश्चय करण्याचा हा दिवस. या दिवसापासून आपल्याला आपल्या जीवावर बेतलेल्या करोना व्हायरस विरोधात युद्धात उतरावं लागत आहे. हे युद्ध रणांगणात नाही तर घराच्या चार भिंतीत राहून आपल्याला लढायचंय. हेही या युद्धाचं वेगळंपण. आणखी एक वेगळपण म्हणजे या युद्धासाठी तलवारी, भाले, मशीनगन, बाँम्ब, एके४७ वगैरे नको

नासिक कर्फ्यू डायरी

नासिक कर्फ्यू डायरी         कर्फ्यू म्हटलं की, जबरदस्तीनं घरात राहण्याची सक्ती... रस्त्यावर आलात तर गोळ्या घालण्याची भीती. एखाद्या सरकारची दहशत, कोणाला तरी काही तरी मिळवायचयं म्हणून आवाज दाबण्याची प्रशासन व्यवस्थेला हाती घेऊन गेलेली प्रक्रिया. मात्र, एखाद्या आजारी पाडणार्या व्हायरसमुळे जगावर स्वत:हून कर्फ्यू ओढवून घेण्याचं संकट ओढवेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. इंग्रजी चित्रपटांमध्ये मात्र, हे चित्र अनेकदा चितारलं गेलं आहे. टाइमपास म्हणून हा चित्रपट पाहतानाही कधी तरी ‘करोना’ नावाचा व्हायरसमुळे असं संकंट जगावर ओढवेल, असं कधी वाटलं नव्हतं. जे आपण आज प्रत्यक्षात अनुभवतो आहे. जनता कर्फ्यूच्या एका दिवसानं आपल्याला इतकं भेदरवून टाकलं की, आपण सायंकाळी व्हायरस गेला, अशी भाबडी आशा बाळगत रस्त्यावर आलो. खरंतर, कोंडून घेण्याची, राहण्याची आपली संस्कृती नाहीच. एखादं पुस्तक संपवायचंय म्हणून आठवडाभर लायब्ररीत अथवा घरात कोंडूंन घेणं वेगळं अन् रस्त्यावर आलात, लोकांना भेटलात, हात मिळविला, जवळून बोललात तर आजारी पडून मृत्यूपर्यंत आपला प्रवास होऊ शकतो, ही भीती वेगळी. भीतीनं कोंडून घेणं म्हणजे एक म

काश्मिरी पंडित राजाचे नाशिक कनेक्शन

काश्मिरी पंडित राजाचे नाशिक कनेक्शन! सिंधचा चंद्रसेन उपासनेसाठी विसावला पांडवलेणीत Ramesh.padwal@timesgroup.com Tweet : @MTramesh नाशिक : नाशिकचं वैभव असलेल्या त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी या बौद्ध लेणीचं आकर्षण जगभरातील अनेकांना राहिलं आहे. मग तो चिनी प्रवासी हू-एन-त्संग असो वा, सातव्या शतकातील सिंधचा राजा काश्मिरी पंडित चंद्रसेन. चंद्रसेन हा काश्मिरी पंडित असला तरी बौद्ध धर्माचा उपासक होता अन् उपासनेसाठी तो नाशिकच्या या लेणींमध्ये विसावला, असा उल्लेख ‘चचनामा’ या अरबी पुस्तकातून समोर आला आहे. ‘चचनामा’ या अरबीतील ग्रंथाचे फारशीमध्ये अनुवाद अरब प्रवासी अली बिन हामिद अबु बकर कोफी यांनी १२१६ मध्ये केला. या ग्रंथाला ‘फतेहनामा’ या नावानेही ओळखले जाते. त्यानंतर अनेकांनी यावर इंग्रजीत लेखन केले. सिंधियाना एनसायक्लोपिडीयानुसार, शेकडो वर्षांपूर्वी अनेक काश्मिरी पंडित काश्मीर सोडून सिंध प्रांतात विसावले. यांनी तेथे आपला राजकीय प्रभाव वाढविला आणि येथील १८४ वर्षे जुन्या राय घराण्याची सत्ता संपवली व सिंध प्रातांत प्रथमच काश्मिरी पंडित घराण्याचा उदय झाला. या घराण्याचे पहिले राजा

भारतरत्न विश्वेश्वरय्यांची मुहूर्तमेढ नाशिकमधून!

१५ सप्टेंबर अभियंता दिन विशेष भारतरत्न विश्वेश्वरय्यांची मुहूर्तमेढ नाशिकमधून! धुळ्यातील पांझरा-दातर्ती पाटबंधारा व नाशिक शहराच्या पाणीपुरवठा योजनेला दिला आकार Ramesh.padwal@timesgroup.com @MTRamesh नाशिक : द्रष्टे अभियंता म्हणून नावलौकिक मिळविलेले भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं अन् नाशिकचं एक अतूट नातं आहे. विश्वेश्वरय्या यांच्या अभियंता क्षेत्रातील कारर्किदीची मुहूर्तमेढ १८८४ मध्ये नाशिकमधून रोवली गेली होती. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी अभियंता म्हणून त्यांची पहिलीच नेमणूक नाशिकमध्ये झाली होती. या कारर्किदीत त्यांनी वेळे आधीच धुळ्यातील प्रकल्प पूर्ण केला होता तर १९०७ मध्ये नाशिक जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्तीवर असताना नाशिक शहराच्या पहिल्या पाणी पुरवठा योजनेचा आराखडा त्यांनीच साकारला होता. मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात सहायक अभियंता म्हणून नियुक्त होताच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांना (जन्म १५ सप्टेंबर १८६१ – मृत्यू १४ एप्रिल १९६२) इंग्रजांनी १८८४ मध्ये नाशिक जिल्ह्याचे सह अभियंता म्हणून नियुक्त केले. रूजू होताच १८८४ सालच्या पावसाळ्यात यांच्या

तिची डेझर्ट सफारी...

तिची डेझर्ट सफारी... २०२० मध्ये ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान अबू धाबी येथे सहावा वूमन हेरिटेज वॉक होत आहे. या हेरिटेज वॉकचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त महिलांसाठी असतो आणि तोही चक्क अमिरातच्या तळपत्या वाळवंटात. महिलांमधील क्षमतांना वेगळा आयाम निर्माण करणारा वॉक सबलीकरण आणि वैचारिक सीमोल्लंघनाची संधीच जगभरातील महिलांसाठी ठरते आहे. अबू धाबी ते अल ऐन या दरम्यानच्या वाळवंटातून चालत महिला १२५ किलोमीटरचा अंतर केवळ ५ दिवसात पूर्ण करतात. या रोमांचकारी डेझर्ट सफरी विषयी...… रमेश पडवळ, नाशिक Rameshpadwal@gmail.com 8380098107 सात एमिरात म्हणजे अबू धाबी, दुबई, शारजाह, अजमान, उम-अल-क्वैन, रास अल-खैमा, फुजैराह. या प्रदेशाची बहुतांशी जमीन ही वाळवंट आहे; परंतु त्यातही प्रत्येक प्रांतातील रेतीमध्ये विविधता आणि विकास ही ‘युएई’ (United Arab Emirates) ची खासियतच म्हणावी लागते. कारण येथील वाळवंट सहनशक्तीचीही कसोटी पाहतात, असे म्हटले जाते. येथील वाळवंटाचे रंग आणि प्रकार जसे बदलतात तसा हवेचा प्रभाव आणि उष्णतेचे प्रमाणही कमी अधिक होताना जाणवते. या वाळवंटात आपल्याला सोडून दिलं तर आपण काय करणार आहोत, नजर जा

आलिजा बहाद्दूर भुलले पख्याल्याला

आलिजा बहाद्दूर भुलले पख्याल्याला                                                                                  जिवाभावाची मैत्री : महादजी शिंदे अन् राणेखानभाई   इतिहासाच्या पानांमध्ये कर्तव्य, कर्तृत्व, जय-पराजय, शौर्य, सूड आणि आत्मशोधासाठी सुरू असलेल्या लढाय्यांमध्ये मैत्रीचे अनेक धागे अलगद गुंफलेले अन् एकमेकांमध्ये गुंतलेले पहायला मिळतात. एकमेकांच्या जीवावर उठलेले मैत्रीच्या धारेत एकजीव होतात. तर, मैत्रीसाठी आयुष्य वाहणारे जीव मोरपंखासारखे अलगद बहुरंगी होत इतिहास घडवताना दिसतात. असचं एक जात, धर्माच्या पलीकडच्या मैत्रीच ऐतिहासीक उदाहरण म्हणजे मराठा सरदार महादजी शिंदे आणि पाणी वाहणार्या राणेखानचं…   रमेश पडवळ Ramesh.padwal@timesgroup.com   कुरुक्षेत्रातील अर्जुन-श्रीकृष्णाच नातं असो वा रामायणातील राम-हनुमानाचं. मैत्रीच्या या अजरामर कथा आविष्कार घडविताना दिसतात. इतिहासाच्या पानांमध्येही अशा अनेक मैत्रीचे धागे दडलेले आहेत. यातील एक आहे मराठा सरदार महादजी शिंदे आणि पखाली (पाणी वाहणारा) असलेल्या राणेखान यांच्या मैत्रीचं. मराठा सरदार व अलिजा बहाद्दूर म्हणून ओळखले जाणारे महादजी शिंदे यांच

गुलशन-ए-इश्क

गुलशन-ए-इश्क  शीख साम्राज्याचे शेर-ए-पंजाब रणजीतसिंहांची राणी जिंद कौर पतीच्या निधनानंतर शीख साम्राज्य सावरण्याचा प्रयत्न करते. मात्र, सत्तेसाठी हपापलेले ब्रिटिश तिची तिच्या मुलापासून अन् साम्राज्यापासून ताटातूट करतात. एकीकडे व्हिक्टोरिया तिच्या मुलाचा सांभाळ करत असते, तर दुसरीकडे साम्राज्य आणि मुलं गमावल्याची दु:खाने जिंद नेपाळमध्ये एकांतवासात असते. शीख साम्राज्य, नेपाळ, लंडन, नाशिक आणि पुन्हा लाहोर असा जिंदच्या अनोखा प्रेमाचा प्रवास म्हणजे गुलशन-ए-इश्कचं म्हणावा… रमेश पडवळ ramesh.padwal@timesgroup.com दोन हजार वर्षांपूर्वी मोहाच्या फुलांनी गोदाकाठ दरवळून जायचा. ती फुलं पाण्यात टपटपायची तेव्हा प्रेमाचा संदेश घेऊन पुढच्या गावापर्यंत हा दरवळ बहरायचा अन् प्रत्येक थेंबा थेंबानं अंग शहारायचं! तेव्हा गालिब असते तर किती सुंदर लिहिलं असतं, असं वाटण्यापूर्वी दोन हजार वर्षांपूर्वीचा हाल नावाचा राजा तेव्हाचा एक गालिब म्हणावं इतका अनोखा कवी, गोदाकाठच्या मोहाच्या फुलांविषयी तेवढंच सुंदर वर्णन सप्तशती ग्रंथात नोंदवितो. अशा या नाशिकनं कवी कालिदासांनाही भुरळ घातली होती. एवढंच काय तर वनवासाला पंचवटीत